लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक – जिल्ह्यातील वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याने पोलिसांनी छापा टाकून १३ लाख रुपयांची २१५ किलो गांजाची झाडे जप्त केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ठाणेनिहाय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याविरुध्द कारवाई केली.

वडनेर भैरव हद्दीत दुधखेड शिवारातील तपनपाडा येथे काही जणांनी गांजाची शेती केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा परिसरात रवींद्र गांगुर्डे (४०, रा. तपनपाडा) यांच्या मालकीच्या शेतात छापा टाकला. छाप्यात २१५ किलो वजनाची गांजाची ६५ झाडे सापडली. यांची किंमत १२ लाख ९३ हजार ६० रुपये असल्याचे सांगितले जाते. गांगुर्डे याने स्वत:च्या टोमॅटोच्या शेतात गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केली होती. त्याच्याविरूध्द वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

दरम्यान रविंद्र याच्यावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आधीही जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. हा गांडा लागवड करत कुठे व कोणास विक्री करणार होता, याबाबत सखोल तपास तपासी पथक करत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganja cultivation in tomato field plants worth rs 13 lakh seized mrj