गणेशोत्सवास अवघे काही दिवस बाकी राहिल्याने सार्वजनिक मंडळांकडून युध्द पातळीवर मंडप उभारणी करण्यात येत आहे. अनेक मंडप चौफुली किंवा रस्त्यांवरच उभारण्यात येत असल्याने वाहतुकीला आतापासूनच अडथळा होऊ लागला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होणार आहे.

शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळे ही राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या वर्चस्वाखालीला आहेत. गणेशोत्सव सुरू होण्याआधीच काही मंडळांनी महापालिका, महावितरण, वाहतूक पोलीस आदी विभागाच्या परवानग्या मिळवल्या आहेत. संबंधित विभागाकडून कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी परवानगी देण्याचे काम ऑनलाईन सुरू केल्याने मंडळांकडून कुठल्या ठिकाणी मंडप उभारला जात आहे, प्रशासनाने दिलेले निकषाचे पालन केले की नाही, याची तपासणी होत नाही, केवळ अर्जावर आभासी पध्दतीने परवानग्या दिल्या जात आहेत. राजकीय वरदहस्त सार्वजनिक गणेश मंडळांवर असल्याने प्रशासनाकडूनही अधिक ताणून धरले जात नाही. गणरायाच्या स्वागताचे, कार्यकारिणीचे असे वेगवेगळे फलक ठिकठिकाणी उभारले जात आहेत.

foreign liquor worth lakhs of rupees has been seized from the bharari team at Chakkinaka In Kalyan
कल्याणमध्ये चक्कीनाका येथे निवडणूक भरारी पथकाकडून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Violation of traffic rules Mumbai, rickshaw drivers Mumbai,
मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा
Mumbai police arrest four Lawrence Bishnoi gang members
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई
In sambhajinagar minor girl is caught driving scooty shocking video
“मुलांआधी पालकांना शिकवा” संभाजीनगरमध्ये चिमुकलीच्या हातात गाडी देऊन वडील निवांत; VIDEO पाहून संतापले लोक
woman on two wheeler seriously injured in collision with rickshaw in Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी
Sudhir Gadgil attempt to remove the displeasure of the aspirants for the assembly election sangli news
सुधीर गाडगीळ यांच्याकडून इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Child dies after being strangled by cousin while pacifying crying
नाशिक : माती खातो म्हणून गळा दाबला गेला, अन्…

हेही वाचा >>> इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

पंचवटी कारंजा परिसरातील गुरूदत्त शैक्षणिक मंडळाने रस्त्यावर मंडप उभारल्याने वाहने वळविण्यास अडचणी येत आहेत. अशोक स्तंभावरील शिवसत्य मंडळाचा अशोकस्तंभ मानाचा राजा , गाडगे महाराज चौकातील शिवसेवा युवक मंडळ, खुटवड नगर येथील शिवसेना शिंदे गट महिला संपर्कप्रमुख सुवर्णा मटाले यांनी आयटीआय-आम्रपाली लिंक रोडवर उभारलेला मंडप, ही केवळ प्रानिनिधिक उदाहणे असून शहरात अनेक मंडळांनी असेच रस्त्यावर अतिक्रमण केल्याची स्थिती आहे. संध्याकाळी गणपती देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यामुळे रस्ता बंद होतो. दिवसा या मंडपामुळे मुख्य रस्त्याला वळसा घालत किंवा मंडपाचे अतिक्रमण चुकवत मार्गक्रमण करावे लागते. यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश दिसत नाही.

हेही वाचा >>> आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

याविषयी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी, गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवानगी दिली जात असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निकषांची पाहणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पाहणी केली जात असल्याचे सांगितले.

मनपाला कारवाईचे अधिकार

सार्वजनिक गणेश मंडळांकडून महानगरपालिका, महावितरण यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलीस विभागाकडे परवानगी मागितली जाते. अन्य विभागांची परवानगी असल्याने पोलीस विभागाकडूनही परवानगी दिली जाते. काही मंडळांच्या मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परंतु, त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहेत. – संदीप मिटके (सहायक पोलीस उपायुक्त)

रस्ते अडविणे अयोग्य

सार्वजनिक मंडळांना परवानगी मिळाली असली तरी जुनी मंडळे ज्या ठिकाणी मंडप उभारतात, त्याच ठिकाणी मंडप उभारावेत. नव्या मंडळांनी कुठेही रस्ता अडवून अतिक्रमण करू नये. – गजानन शेलार (पदाधिकारी, सार्वजनिक गणेश मंडळ समिती)

कारवाई करणार

रस्त्याच्या मधोमध नवीन गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी नाही. रस्त्यात मंडप उभारणी करत असतील तर आम्ही कारवाई करू. – अशोक करंजकर ( आयुक्त, महापालिका)