जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच पारोळ्यानजीक गॅस सिलिंडरच्या मालमोटारीला अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे समोर आली असून, त्यामुळे मालमोटारीला आग लागली.  धुळ्याहून तातडीने आलेल्या अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे अपघात झाल्याने गॅस सिलिंडरने भरलेल्या मालमोटारीला भीषण आग लागली.  याबाबतची माहिती मिळताच पारोळा येथील तहसीलदारांसह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी बंबांद्वारे मार्‍याचा करीत शर्थीने आग विझविली जात आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थान समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश दिले असून, आमदार चिमणराव पाटील हेही घटनास्थळी झाले आहेत. परिसरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा >>>स्वच्छतेसाठी पालकमंत्री दादा भुसे उतरले नदीपात्रात

पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मार्गदर्शन करीत आहेत. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने पाठविले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas cylinder cargo truck accident near parole jalgaon amy