हेही वाचा >>>नाशिक: आदिवासी नृत्याचा राज्यपाल, मंत्र्यांनाही मोह; सांस्कृतिक महोत्सवात धरला ठेका
तळोदा शहरात मंगळवारी जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खा. डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, आमदार आमश्या पाडवी, आमदार काशीराम पावरा उपस्थित होते. यानंतर पत्रकाराशी बोलतांना महाजन यांनी जळगाव दूध संघावरुन एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. जळगाव दूध संघाचे कार्यकारी संचालक महेश लिमये यांची झालेली अटक अथवा सुरु असलेली चौकशी कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरीत अथवा दबावाखाली झालेली नाही. या प्रकरणात चौकशी होऊ द्या, खडसेंच्या जबाबावरून ती चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>>नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी
माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली असून तिचे महाजन यांनी समर्थन केले. आव्हाडांनी महिलेला कसे ढकलले आहे हे सर्वांनी पाहिले आहे. याआधी चित्रपटगृहात त्यांनी लोकांना मारहाण केली होती. त्यांना हा अधिकार कोणी दिला. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात नारायण राणे, राणा दांपत्य, कंगणा राणावत व आपल्यावर केलेली कारवाई कोणत्या नियमांनी केली. ती सुडबुद्धीने झालेली नाही का, असे प्रश्न महाजन यांनी केले. राज्यात शिवसेनेचा शिंदे गट हा सर्वात मोठा गट आहे. आता यात १३ खासदार असून पुढील काही दिवसात ही संख्या पंधराच्या घरातही पोहचेल असा दावा त्यांनी केला.