महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”

“त्यांनी पाठिंबा मागितला तर, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘मविआतील नेत्यांवरील संकटांमागे मुख्यमंत्र्यांचे ‘जादूटोणा’ प्रेम…’, शिवसेनेचा एकनाथ शिंदेंना टोला!

“उद्या एकटे नाना पटोलेच…”

भाजपा घर फोडण्याचं काम करत आहे, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यावर गिरीश महाराजांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला तुमचं घर संभाळता येत नाही. तुमच्या घरातील माणसं तुम्हाला संभाळता येत नाही. सर्वजण बाहेर पडत आहेत. उद्या एकटे नाना पटोलेच पक्षात शिल्लक राहतील, अशी शंका आहे. ते सुद्धा इकडे-तिकडे असताताच. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण राहिल, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. काँग्रेसचं रामभरोसे काम सुरु आहे,” असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.