धुळे – वन्य प्राण्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या आठ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथे ही घटना घडली. दीदी शिवराम पावरा असे या बालिकेचे नाव आहे.
नंदाळे शेत शिवारात आईवडील कपाशी वेचण्याचे काम करत असताना दीदी लिंबाच्या झाडाखाली खेळत होती. अचानक आलेल्या वन्य प्राण्याने तिच्यावर हल्ला चढवत तिला फरफटत नेले. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. प्राण्याने उचलून नेताच बालिकेच्या आईने आरडाओरड केल्यावर वन्यप्राणी बालिकेला सोडून पळून गेला. गंभीर जखमी बालिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा – नाशिक : महिरावणीत परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानांची तपासणी
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी बालिकेला उचलून नेणारा प्राणी कोणता होता, हे बालिकेच्या आईला सांगता आले नसल्याचे नमूद केले. तो मोठ्या मांजरीसारखा होता, असे वर्णन त्यांनी केले. यामुळे हल्ला करणाऱ्या प्राण्याची खात्रीशीर माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.