आंघोळीचे गरम पाणी अंगावर पडल्याने जखमी झालेल्या १० महिन्याच्या बालिकेचा रुग्णलयात मृत्यू झाला.येथील जुना गंगापूर नाका परिसरातील एका इमारतीत शुभम इंगळे कुटूंबासमवेत राहतात. १० महिन्याच्या आवेरा हिला आंघोळ घालण्यासाठी आईने गरम पाणी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईचे लक्ष नसताना आवेराने खेळण्याच्या नादात गरम पाणी अंगावर घेतले. या प्रकारात ती गंभीर जखमी झाली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस उपचार सुरू असतांना तिचा बुधवारी मृत्यू झाला.