लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक: जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असताना नागरिकांवर त्याचे हल्ले वाढले आहेत. सिन्नर परिसरात सात वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील दापूर परिसरातील गोनाई मळा येथे आव्हाड कुटूंबिय राहते. रविवारी सकाळी आव्हाड कुटूंबियांपैकी किरण हे कामानिमित्त बाहेर पडले. त्यांनी घरात असलेल्या आपल्या मुलीला भ्रमणध्वनी घेऊन ये, असा आवाज दिला. वडिलांना सात वर्षाच्या संस्कृतीने भ्रमणध्वनी नेऊन दिला. तेवढ्यात घराजवळील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. हा प्रकार तिची मोठी बहिण घरातून पाहत होती. तिने आरडाओरड केल्याने बिबट्याने संस्कृतीला त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. या हल्ल्यात बिबट्याने संस्कृतीच्या ओठाखाली तसेच मानेजवळ चावा घेतला. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा-सप्तश्रृंग गडावर चार दिवसाआड पाणी पुरवठा, महिलांची पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती
सिन्नर तालुक्यातत बिबट्याचा हा चौथा हल्ला आहे. बिबट्याला जेरबंद होण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. जखमी संस्कृतीला पुढील ७२ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी मनिषा जाधव यांनी दिली.