नाशिक : पंचवटीतील तपोवनात मिळालेल्या युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि तिचा खून करणाऱ्या संशयितास पकडण्यात नाशिक गुन्हे शाखा विभाग एकच्या पोलिसांना यश आले आहे. संशयिताला भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अनैतिक संबंधांतून तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शनिवारी तपोवन परिसरातील मारुती वेफर्स केंद्रामागील आवारात एका युवतीचा कु जलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल के ला गेला. या गुन्ह्य़ाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने करण्यात आला.
युवतीची ओळख पटविणे तसेच संशयित मारेकऱ्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर पद्धतीने हा तपास करण्यात आला. घटनास्थळी दवाखान्याची कागदपत्रे सापडली होती. भ्रमणध्वनीच्या तांत्रिक विश्लेषणावरून तसेच पारंपरिक पद्धतीने तपास करण्यात आला. देवळाली गाव येथील झैनब शाम ऊर्फ जाकिर कु रेशी अशी युवतीची ओळख पटली असून ती तीन महिन्यांची गरोदर होती.