लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे पार्टी देतात, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आरोपीसोबत मैं हूँ डॉन या गाण्यावर थिरकणे हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ही पार्टी कधी, कुठे झाली, बॉम्बस्फोटातील आरोपी कसा आला, हे पोलीस तपासात उघड होईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप करुन छायाचित्र आणि चित्रफित दाखवली. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी सुरूही झाली आहे. या घटनाक्रमावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राजकारणाचा स्तर अतिशय खालावत असून मयत व्यक्तीच्या नावाने राजकारण करून आपल्या पदाधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्याचा समाचार शिवसेनेचे पालकमंत्री (शिंदे गट) भुसे यांनी घेतला. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी करणे हे देशद्रोही कृत्य आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. सलीम कुत्ता मयत असल्याचे सांगून ठाकरे गट लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे देखील देशद्रोही कृत्य आहे. आपल्या माहितीनुसार सलीम कुत्ता हा पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. टाडा न्यायालयाने दिलेली जन्मठेप भोगत आहे. असे असताना तो मयत असल्याचे सांगणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला भुसे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हाणला.
सलीम कुत्ता हा बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली आहे. बडगुजर यांच्या पार्टीचे प्रकरण बाहेर निघाल्यानंतर ठाकरे गटाने भाजपच्या नेत्यांनीही दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात लावलेल्या हजेरीची छायाचित्रे प्रसारित केली. या संदर्भातील प्रश्नावर पालकमंत्र्यांनी ते मुस्लिम समाजाच्या प्रमुखांचे लग्न होते. तिथे पदाधिकारी गेले होते. परंतु, ठाकरे गट आपल्यावरील आरोपांवर बोलणार नाही. ज्या बडगुजरांवर आरोप झाले, त्यांनीही बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत होतो हे मान्य केले आहे, सार्वजनिक कार्यक्रमात असेल, असे मोघमपणे सांगितले.परंतु, चौकशीत सर्व गोष्टी सिध्द होतील, असे भुसे यांनी सूचित केले.