एकीकडे लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक घडामोडींमुळे सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गुरुवारी सोन्याचे दर प्रतितोळा ५४ हजार ४७५ रुपयांपर्यंत होते. चांदीचे दरही प्रतिकिलो ६९ हजारांपर्यंत होते. दरातील चढ-उताराने गुंतवणूकदारांमध्येही चलबिचल वाढली आहे.

हेही वाचा- नंदुरबार जिल्ह्याला आरोग्य सुविधेसाठी १३ कायाकल्प पुरस्कार

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
gold prices
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांची चिंता…
Anil Aggarwal Success Story
Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक

दोन महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. देशात लग्नसराईच्या हंगामात सोने- चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते. शिवाय, अमेरिकन सुवर्ण बाजारपेठेतील चढ-उतार, फेडरल बँकेच्या व्याजात होणारे बदल, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य स्थिती आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल वाढल्याने कधी दर वाढतात तर, कधी कमी होतात. लग्नसराई सुरू असल्याने मागणी वाढली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सोन्याचा प्रतितोळा दर ५२ हजार ७०० रुपयांपर्यंत, तर ३० नोव्हेंबर रोजी ५२ हजार ८५० रुपयांपर्यंत होता. पाच डिसेंबर रोजी दर प्रतितोळा ५४ हजारांपर्यंत होता. सात डिसेंबर रोजी दर ५३ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले होते. नऊ डिसेंबर रोजी दरात वाढ होऊन ५४ हजार ५० रुपयांपर्यंत गेले होते. २२ डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा (जीएसटीसह) आकडा पार केला होता. तीनच दिवसात त्यात घट होऊन २५ डिसेंबर रोजी दर ५४ हजार ४०० रुपयांपर्यंत होते.

हेही वाचा- नाशिक: शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरुच; दोन जणांविरुध्द गुन्हा

चांदीच्या दरातही चढ-उतार सुरू आहेत. एक डिसेंबर रोजी चांदीचे दर प्रतिकिलो ६३ हजार ८०० रुपये होते. त्यानंतर ते ६९ हजारांपर्यंत गेले होेते. २२ डिसेंबरला चांदी ७० हजारांपर्यंत पोहोचली होती. २४ डिसेंबर रोजी सोन्याचे दर ५४ हजार ४०० रुपयांपर्यंत होते. चांदी प्रतिकिलो ५८ हजारापर्यंत होती. गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती.

हेही वाचा- नाशिक: वाहून गेलेल्या बेसाल्ट शोधासाठी गोदापात्र कोरडे करणार; कुंड काँक्रिटीकरणमुक्तीसाठी काम पुन्हा सुरू करण्याची तयारी


सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. सध्या कमी असलेले बँकांचे व्याजदर, तसेच जागतिक पातळीवर सोन्याची वाढलेली मागणी यामुळे दरवाढ झाली आहे. सोन्याची आवकही कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतितोळा ५२ हजार दर होता. आता तो ५४ हजार ४७५ रुपयांपर्यंत गेला आहे. आगामी काळात ६० हजारांपर्यंत दर पोहोचण्याची शक्यता आहे, असे मत जळगावचे सोन्याचे व्यापारी आकाश भंगाळे यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदारांसह सर्वसामान्यांचा दीर्घकालीन गुंतवणूक सोने खरेदीकडे कल असतो. सोन्या-चांदीतील चढ-उताराने गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल झाली आहे. असे मत जळगावचे सोन्याचे व्यापारी कपिल खोंडे यांनी व्यक्त केले.

Story img Loader