धुळे : जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथील बालकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणी संशयितावर कठोर कारवाई करावी, जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे शिंदखेडा येथे बंद पाळण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सकाळी भगवा चौफुलीपासून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. बंदला शिंदखेडावासीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाने या मूक मोर्चात सहभाग घेतला. सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शविला. माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक देसले, दीपक अहिरे, विनायक पवार, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी सैनिक नामदेव येडवे आदींसह अनेक शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोर्चात सहभाग घेतला होता.