नाशिक – मालेगाव तालुक्यात लुटमारीसह कुटूंबाला मारहाण करण्यात आली. लुटमारीत १२ लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनिल चौधरी (४४, रा. लोंढे) हे कापूस व्यापारी जगदीश दसपुते यांच्यासोबत दुचाकीने झोडगे येथून कळवाडी परिसराकडे जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील दुचाकी रस्त्यावर आडवी लावत चौधरी आणि दसपुते यांना दांडक्याने मारहाण केली. दसपुते यांच्याकडे कापूस विक्रीतून आलेले १२ लाख रुपये होते. संशयितांनी जबरीने हिसकावून घेतले. मारहाणीत दोघेही जबर जखमी झाले. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत विश्वनाथ निकम घरी असतांना संशयित मनोज जगताप (३४, रा. कृष्णांजली नगर) हा घरी आला. निकम यांना मारहाण आणि शिवीगाळ करु लागला. निकम यांची पत्नी, बहीण आणि मुलांनाही मारण्याचा प्रयत्न केला. नीलेश आहेर भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही बेसबॉल स्टीकने मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत निकम यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन साखळी लंपास करण्यात आली. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.