२०१६ या वर्षांसाठी अमेरिकेतील मुख्य कार्यालयात ठेवण्याकरिता ‘गुगल’ने येथील चित्रकार नयन नगरकर यांनी वेगवेगळ्या रेखाचित्रांसह तयार केलेल्या दिनदर्शिकेची निवड केली आहे. ही दिनदर्शिका कशी आहे, इतर दिनदर्शिकांपेक्षा ती कशी वेगळी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे नगरकर यांचे रेखाचित्र न्याहाळण्याची संधी नाशिककरांना २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत मिळणार आहे.
येणाऱ्या प्रत्येक वर्षांत मनुष्याने निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, हा उद्देश ठेवून ‘इन्व्हॉल्व्हमेंट विथ गुगल’ या संकल्पनेवर आधारित निवडक १२ रेखाचित्रे नयन नगरकर यांनी २०१६ वर्षांच्या दिनदर्शिकेसाठी गुगलकडे पाठविली होती. नगरकर यांच्या या रेखाचित्र दिनदर्शिकेची अमेरिकेतील आपल्या मुख्य कार्यालयासाठी गुगलने निवड केली असून हा एक प्रकारे नाशिकचाही बहुमान आहे. एका नाशिककर युवा चित्रकाराने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरली असून या रेखाचित्रांचे व दिनदर्शिकेचे प्रदर्शन शुक्रवारपासून गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सुरू होत आहे. रविवापर्यंत दररोज सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत हे प्रदर्शनपाहता येणार आहे. नाशिककर चित्र रसिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन नगरकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा