नाशिक – देवळा तालुक्यातील उमराणे येथे मुंबई-आग्रा महामार्गावर शिधापत्रिकेवर वितरणासाठी असलेला शासकीय गोदामातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनातून सुमारे ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमराणे येथे महामार्गावर काळ्याबाजारात विक्रीसाठी धान्यसाठा घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना सापडले. या वाहनात तीन लाख ६० हजार रुपयांच्या सुमारे २४६ गोणी ( प्रत्येकी ५० किलो ) तांदूळ आणि ३७ हजार ५०० रुपयांच्या सुमारे ३० गोणी गव्हाचा साठा ( प्रत्येकी ५० किलो) मिळून आला. शासकीय गोदामातील धान्याचा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. याबाबत देवळा येथील पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांनी संशयित विजय देवरे (रा उमराणे) आणि योगेश भामरे ( ३२, चालक, रा.खुंटेवाडी, देवळा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grain on ration card stock of 12 lakh seized from vehicle ysh