नाशिक – मांजरीने कोंबडीची पिले खाल्ल्याच्या संशयावरून नातवाने वयोवृद्ध आजोबाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सटाणा तालुक्यातील राजापूरपांडे शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विश्लेषण: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद काय आहे? त्या दिवशी नेमके काय घडले?

महारू पगार (८०) व योगेश पगार (राहणार राजापूरपांडे) हे दोघे नात्याने चुलत आजोबा व नातू आहेत. चार दिवसांपूर्वी योगेशने पाळलेली कोंबडीची तीन पिले मांजरीने खाल्ल्याचा संशयावरून महारू पगार यांच्याशी वाद घातला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन भांडणात झाले. योगेशने हातातील काठीने आजोबा महारू पगार यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडवण्यास गेलेल्या नातीलाही योगेशने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी योगेश पगार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.