लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नाशिक : चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकाची १४ लाख रुपयांना आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक
चांदवड येथील बाळकृष्ण रकिबे (३२) यांच्या शेतातून तीन संशयितांनी निर्यात करण्यात येणारे १९१ क्विंटल ५० किलो द्राक्षे खरेदी केले. द्राक्षे खरेदीसाठी ठरलेले १४ लाख ३६ हजार रुपये न देता रकिबे यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. रकिबे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
First published on: 05-05-2024 at 18:33 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grape grower cheated for rs 14 lakhs mrj