संजय राऊत हे स्वतःला मी वाघ… मी वाघ आहे म्हणत असताना आता घाबरले कशासाठी , धमकीला काय घाबरताहेत. ते दात काढलेले वाघ आहेत काय,अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खिल्ली उडविली. शहरातील जिल्हा परिषदेतर्फे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आदित्य ठाकरेंसह संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर वाक्बाण सोडले.
हेही वाचा- नाशिक:‘पवारांच्या वक्तव्याने वस्तुस्थिती उघड’
गद्दार… गद्दार ऐकून लोक कंटाळले असल्याचेही त्यांनी म्हटले. आता सर्व संपलंय. त्या गोष्टीला सात-आठ महिने झाले आहेत. नवीन उभारीने त्यांनी पक्ष उभारला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला महत्त्व आहे आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा आणि आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा, असा टोलाही ठाकरेंना लगावला.
हेही वाचा- कांदा गडगडल्याने शेतकरी आक्रमक; क्विंटलला ५०० रुपयांचा दर, नाशिकमध्ये ‘रास्ता रोको’
बाळासाहेब आमच्या पाठीमागे आहेत.
संत गाडगेबाबांसह संतांनीच देशाला आणि राज्याला दिशा दिली होती की स्वच्छता करा, स्वच्छता पाळा. आज देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव या गोष्टीचा अवलंब करीत आहे. आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार व विचारानुसार काम केले, आपला देश स्वच्छ बघायचा असेल, तर प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.