जळगाव : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा जवळपास सुटलेला असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात माजी गुलाबराव पाटील यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यास किमान उपमुख्यमंत्री व्हावे अशी पक्षातील काही आमदारांची मागणी आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असे सर्वांचे मत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर दीपक केसरकर, दादा भुसे, भरत गोगावले, शंभुराज देसाई, उदय सामंत या नेत्यांची नावे पर्याय म्हणून पुढे आली आहेत.

हेही वाचा…टोमॅटोच्या शेतात गांजाची शेती, १३ लाख रुपयांची झाडे जप्त

गुलाबराव पाटील यांच्याही नावाची चर्चा आता उपमुख्यमंत्रीपदासाठी सुरु झाली आहे. शिंदे गटाकडून त्यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही किंवा वैयक्तिक गुलाबराव पाटील यांनी त्यासंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी लावण्यात कार्यकर्त्यांकडून आलेल्या फलकांवर त्यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून स्पष्ट उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री होते, याशिवाय त्यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जळगाव ग्रामीणमध्ये पराभव केला आहे. राज्याच्या नवीन मंत्रिमंडळातही त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil name coming out for deputy post cm eknath shinde unwilling to become deputy cm sud 02