जळगाव – भुसावळ शहरानजीकच्या अकलूद येथील नामांकित शाळेत नववीतील विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी बंदूक मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्हाळी सुटीनंतर दीड-दोन महिन्यांनंतर शाळांची घंटा वाजली आहे. भुसावळ शहरानजीक असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल शाळेतील नववीच्या वर्गात दप्तर तपासणी करीत असताना विद्यार्थ्याकडे गावठी बंदूक मिळून आल्याने शिक्षकांना धक्काच बसला. शिक्षकांकडून शाळा प्रशासनाला याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर फैजपूर येथील पोलिसांना माहिती देण्यात आली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – जळगाव : अमळनेर दंगलीतील संशयिताच्या मृत्यूची सीआयडी चौकशी

सहायक निरीक्षक नीलेश वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. संशयित विद्यार्थ्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राचार्य आनंद शाह (३९, रा. प्लॉट नंबर एक, विश्वधारा अपार्टमेंट, शांतीनगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून फैजपूर येथील पोलीस ठाण्यात संशयित संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याकडून पाच हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची बंदूक जप्त केली आहे.

Story img Loader