नाशिक – जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दोन कंटेनरांची इगतपुरी पोलिसांनी तपासणी करून सव्वा कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.

मागील १५ दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलीस गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसाठी सापळा रचून शोध घेत होते. गुटख्याने भरलेले सदरचे कंटेनर इगतपुरी परिसरात आले असता इगतपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू सुर्वे यांनी कंटेनर ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेला गुटखा हा हरियाणामधून भिवंडी येथे नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – जळगाव : आदिवासी विकास प्रकल्पातील लाचखोर लेखाधिकारी जाळ्यात

या प्रकरणात सलमान आमीन खान (३२), इरफान आमीन खान (३१, रा. हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्कृष्टरित्या तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.