लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: मालेगाव येथील ए.टी.टी. विद्यालयात शिक्षणशास्त्र पदविकेची (डी.एड) परीक्षा सुरू असतांना परीक्षार्थींना लघुशंकेसाठी जाऊ न दिल्याने एका विद्यार्थिनीला त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे परीक्षा केंद्र संचालकांवर आरोप होऊ लागल्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्रमुखांनी आरोप नाकारात केवळ कॉपीमुक्त परीक्षेला विरोध दर्शविण्यासाठी असे आरोप होत असल्याचे उत्तर दिले आहे.

ए.टी.टी. विद्यालयात डी.एडची परीक्षा सुरू आहे. या ठिकाणी केंद्र संचालक बेलन यांनी परीक्षा सुरळीत होण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. सोमवारी परीक्षा सुरू असतांना एका विद्यार्थिनीने लघुशंकेला जाऊ देण्याची विनंती केली. मात्र केंद्र संचालकांनी तिला जाऊ न दिल्याने तिला कपड्यातच लघुशंका झाली. संबंधित विद्यार्थिनीला रक्तस्त्रावही सुरू झाला. दरम्यान, संबंधित केंद्र संचालकांविरूध्द वेगवेगळ्या तक्रारी होत आहेत. विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करणे, वर्गात सतत फिरुन विद्यार्थ्यांना त्रास देणे, नको त्यावेळी विद्यार्थ्यांना उठवून तपासणी करणे, विशिष्ट मुलांच्या वर्गात बसून दीड ते दोन तास त्यांच्यासमोर उभे राहणे, अशी त्यांची कामाची शैली राहिली आहे. बेलन यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिक्षक भारती विभागाच्या वतीने राजेंद्र लोढा यांनी केली आहे.

आणखी वाचा-नाशिक: जिल्ह्यात सर्पदंशाने दोन जणांचा मृत्यू

दरम्यान, शिक्षणशास्त्र विभागाची परीक्षा ज्यांच्या अंतर्गत होते, त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य अनिल गौतम यांच्याकडेही याविषयी तक्रार करण्यात आली आहे.

शिक्षण विभाग सध्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे. परीक्षा केंद्रावर काहींनी लघुशंकेसाठी जाऊ देण्याची विनंती केली असता त्यांना सोडण्यात आले. संबंधित विद्यार्थिनीच्या बाबतीत असे काहीही झालेले नाही. पर्यवेक्षक, परीक्षकांवर देखरेख करणाऱ्यांवर थेट तक्रार करता येत नसल्याने असे आरोप करण्यात येत आहेत. -अनिल गौतम (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)