नाशिक : महाराष्ट्र हौशी रोप स्किपिंग (दोरउडी) संघटना आणि क्रीडा भारती नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये आयोजित २४ व्या राष्ट्रीय दोरउडी स्पर्धेत सर्वाधिक १८० गुणांसह हरियाणा संघाने प्रथम तर, १४० गुणांसह दिल्ली संघ द्वितीयस्थानी राहिला. एकूण १२८ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीयस्थानी राहिला.  मुलींच्या गटात  सर्वाधिक १६० गुणांसह दिल्ली संघाने प्रथम, १४८ गुणांसह हरियाणा द्वितीय तर, १३२ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीयस्थानी राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धेत ११, १४, १७ वर्षे आणि वरिष्ठ गट पुरुष, महिला अश्या चार गटांचा समावेश होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र हौशी रोप स्किपिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव ,अमित घुगे, विजय बनछोडे, नाशिक जिल्हा दोरउडी संघटनेचेे अध्यक्ष शाम बडोदे, क्रीडा भारती नाशिकचे अध्यक्ष विनोद शिरभाते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. के. आहिरे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र संघटनेचे सचिव संजय पाटील यांनी केले. आभार पवन खोडे यांनी मानले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana delhi win title 24th national jumping competition at nashik ysh