नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढेल. ज्या ठिकाणी शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी, अखेरीस महापौर, नगराध्यक्ष महायुतीचेच होतील, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त सोमवारी नाशिक येथे आलेल्या मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या प्रश्नावर मुश्रीफ यांनी आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला खुर्ची व पाणी देणे हा पंतप्रधान मोदी यांचा मोठेपणा असल्याचे नमूद केले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गट यांच्यात पक्षातील पद वाटपातील आर्थिक व्यवहारांवरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. याविषयी आपणास माहिती नाही. मी आजपर्यंत मंत्री झालो, पण कुणाला पाच पैसे दिले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आता नाराज नाहीत. ते पक्षाच्या कामाला लागले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आपण माहिती घेतल्याचा दाखला मुश्रीफ यांनी दिला. ठाकरे बंधुंच्या भेटीवर त्यांनी भाऊ-भाऊ वा काका-पुतणे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले.

पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल

जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार, तिथे त्या पक्षाचा पालकमंत्री हा निकष पूर्वी सांगितला गेला होता. हा निकष असेल तर नाशिकचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला (अजित पवार) मिळणे स्वाभाविक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यासंदर्भात चर्चा झाली असेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासंदर्भात तोडगा काढतील, असे मुश्रीफ यांनी सूचित केले.