नाशिक : जिल्ह्यात आठ ते ११ मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसाचा ४१ गावांतील ५१३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसला. यात सर्वाधिक ४७५ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटात १३३८ शेतकरी बाधित झाले. अनेक तालुक्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात असल्याने हे काम संथपणे पुढे सरकत आहे.

चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात घरांची पडझड झाली. वीज पडून चांदवड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर सिन्नरमध्ये घराची भिंत पडून महिला जखमी झाली. वीज पडून पशूधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाने हातातोंडाशी आलेला आंब्याचा घास हिरावला गेला. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार ४१ गावातील १३३८ शेतकरी बाधित झाले. या गावातील एकूण ५१३ हेक्टरवरील पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले. डाळिंबाचे (साडेचार हेक्टर), द्राक्ष (१.२१ हेक्टर) यासह काही ठिकाणी मका व कांद्याचे नुकसान झाले. २४ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नैसर्गिक संकटाची सर्वाधिक झळ पेठ तालुक्यास बसली. या तालुक्यातील २९ गावांतील १२७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या एकाच तालुक्यात ४६९ हेक्टरवरील आंबा आणि २४ हेक्टरवरील अन्य पिके असे ४९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी चार गावांना पावसाचा फटका बसला. नाशिकमध्ये (साडेसात हेक्टर), सुरगाणा (३.५१ हेक्टर), दिंडोरी (चार), सटाणा (३.८०) आणि निफाड (१.२१ हेक्टर) पिकांचे नुकसान झाले.

Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग
Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के

हेही वाचा…नाशिकमध्ये टंचाईची तीव्रता गडद कशी होतेय? १२ तालुक्यांतील ११३९ गाव-वाड्यांना टँकरने पाणी

निवडणुकीमुळे पंचनामे संथपणे

जिल्ह्यात पावसामुळे जिवितहानी, पशूधन, फळपीक, कांदा चाळीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असले तरी त्यास विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २० मे रोजी नाशिक, दिंडोरी मतदारसंघात मतदान होणार आहे. कृषी व महसूलसह अन्य विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांची निवडणूक कामावर नियुक्ती झाली आहे. निवडणूक प्रशिक्षण व अन्य कामांमुळे पंचनाम्याचे काम संथपणे पुढे जात आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास नुकसानीचे प्रमाण वाढत राहील. यामुळे पुन्हा, पुन्हा ते काम करावे लागण्याची भीती व्यक्त केली जाते.