मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे पदाधिकारी राम पवार यांनी दिली.महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यांत बकालेंच्या अटकेसाठी उपोषण सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. बकाले निलंबित झाल्यानंतरही नियमानुसार विहित नियुक्ती ठिकाणी रुजू न होता पसार झाले. बकालेंच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : नाशिक : संस्थेत कमी अन सत्कारातच अधिक वेळ; मविप्र पदाधिकाऱ्यांच्या सोहळ्यांचे अर्धशतक
या सुनावणीदरम्यान मराठा समाजातर्फे तब्बल ४७ वकिलांनी बाजू मांडण्यासाठी मदत केली. अॅड. गोपाळ जळमकर आणि त्यांच्या सहकार्यांनी बकालेंच्या जामिनास कडाडून विरोध केला. यामुळे जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर बकालेंनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यानंतर सुनावणी होऊन उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला असल्याचे सकाल मराठा समाजाचे राम पवार यांनी सांगितले.