लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक: वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात पदविका आणि पदवी मिळविणारे तसेच वेगवेगळ्या विषयांत द्विपदवीधर अशा उच्चशिक्षितांना देखील पोलीस दलातील उपनिरीक्षक हे पद खुणावत आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील १२२ व्या सत्रातील (सरळसेवा) उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यातून ही बाब ठळकपणे उघड झाली.
१२ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर शनिवारी ४९४ उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. दीक्षांत सोहळ्यात प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी संबधितांची माहिती दिली. या तुकडीत ३४९ पुरूष तर १४५ महिला आहेत. त्यातील ८८ टक्के पदवीधर तर १२ टक्के पदव्युत्तर आहेत. तीन वैद्यकीय, १८ (बी. टेक्), १४५ अभियांत्रिकी पदवीधारक (बीई), ५५ व २७९ पदवीधर असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण तुकडीत अधिक्याने ३० ते ३५ वयोगटातील उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तुकडीचे सरासरी वय ३४ वर्ष आहे. उच्च शिक्षितांचा पोलीस दलाकडे कल वाढत आहे. सरळसेवा भरतीत संबंधितांनी आपली गुणवत्ता सिध्द करीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.
आणखी वाचा-“आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांवर पट्टी”, बारसूवरून देवेंद्र फडणवीस यांची टीका
संभाजीनगर येथील डॉ. रेणूका परदेशी या वैद्यकीय व्यवसाय सोडून पोलीस दलात दाखल झाल्या. त्या तीन वर्ष वैद्यकीय सेवेत होत्या. २०१९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाचा त्यांनी पहिल्यांदा अर्ज भरला होता. पण ती परीक्षा एका गुणाने हुकली. त्यानंतर उपनिरीक्षक पदासाठी तयारी करीत त्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या. वैद्यकीय आणि पोलीस दलाच्या कामात कुठलाही फरक नाही. प्रशिक्षणादरम्यान आजारी पडणाऱ्या मुलींना आपण वैद्यकीय सेवा दिली. पोलीस दलात काम करताना पोलीस अधिक डॉक्टर अशी सेवा देणार असल्याचे डॉ. परदेशी यांनी नमूद केले. शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या डॉ. रेणुका या कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती आहेत. शालेय व महाविद्यालयीन जीवनात सोयगावच्या शेतात काम करणारी मुलगी पोलीस अधिकाऱी बनल्याचा कोण आनंद आई-वडिलांसह कुटुंबाच्या चेहऱ्यावर झळकत होता.
कोकणचा टक्का कमी
पोलीस दलात दाखल झालेल्या तुकडीत कोकण विभागातून सर्वात कमी म्हणजे २३ जणांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाईचे पोलीस, सैन्य दलातील सेवेकडे विशेष लक्ष असते. तुकडीतील १६३ जणांनी तेच अधोरेखीत केले. या व्यतिरिक्त उपनिरीक्षक म्हणून दाखल झालेल्यांमध्ये मराठवाड्यातील १२८, उत्तर महाराष्ट्रातील १०३, विदर्भातील ७१ आणि गोव्यातील एकाचा समावेश असल्याचे प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी सांगितले.