लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ट्रॅक्शन यंत्र कार्यशाळेने (मशीन वर्कशॉप) भारतीय रेल्वेच्या सर्वोत्कृष्ट नवउपक्रमासाठी सर्व क्षेत्रांमध्ये वर्ष २०२२-२३ मधील सर्वोत्कृष्ट नवउपक्रमासाठी असलेले अखिल भारतीय पातळीवरील रेल्वे मंत्रालयाचे पहिले पारितोषिक पटकावले आहे.

Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम
nashik hindu organization protest march
नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
Rashtriya Arogya Abhiyan, Municipal corporation,
मास उपक्रमांतर्गत कामांची माहिती मनपाकडे अनुपलब्ध

मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागातंर्गत नाशिकरोड येथील ट्रॅक्शन मशीन वर्कशॉपच्या थ्री फेज रोटर प्रकारातील (योजना एक) सुधारित झिरकोनिअम कॉपर स्टॅम्पिंग हा घटक त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी ओळखला जातो. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नाशिकरोड मध्य रेल्वेने तीन लाखाचे रोख पुरस्कारासह प्रथम पारितोषिक मिळवले. रेल्वे मंत्रालयामार्फत चालवल्या जाणार्या अभिप्राय योजनेचा उद्देश भारतीय रेल्वेतील सुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या सर्जनशील कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांचा सन्मान करणे हा आहे. ही योजना विविध रेल्वे विभागांमध्ये उत्पादकता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या व्यावहारिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी आहे.

आणखी वाचा-शबरी घरकुल योजनेतंर्गत पंचायत समितीकडून १३४ प्रस्ताव मंजूर

ट्रॅक्शन मशिन वर्कशॉप, नाशिक रोडने इंजिनसाठीच्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक असलेल्या रोटरचे उत्पादन सुरू केले. खर्चात बचत करण्यासाठी, इंजिनचा टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी रोटर्सच्या नाविन्यपूर्ण रचनेसह कार्यशाळेने मोठी प्रगती केली. रिसर्च डिझाईन्स आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनद्वारे या नवकल्पनेची चाचणी करून ते प्रमाणित करण्यात आले, ते आता इंजिनच्या मोटर्समध्ये लागू केले जात आहे.

सुमारे सव्वा पाच लाख रुपये खर्चाच्या तुलनेत प्रति नग संपूर्ण रोटर तयार करण्यासाठी ही नवकल्पना १० हजार रुपयांची बचत करते. रेल्वेला वार्षिक आधारावर एकूण सहा हजार रोटर्सची आवश्यकता आहे. केवळ खर्चाचा विचार केला तर, यामुळे वार्षिक सहा कोटीहून अधिकची बचत होईल. या बदलामधील रोटरमध्ये झिरकोनियम-कॉपर स्टॅम्पिंगचा पुरेपुर वापर करणे, तसेच सिल्व्हर ब्रेझिंग रॉडचा वापर कमी करणे या गोष्टी समाविष्ट आहेत. प्रत्येक रोटरमध्ये चार सुधारित स्टॅम्पिंग वापरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या सुधारित स्टॅम्पिंगमध्ये बंद स्लॉट, सिल्व्हरचा अपव्यय कमी करणे, ब्रेझिंग गुणवत्ता सुधारणे आणि ब्रेझिंगचा वेळ वाचवणे ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

आणखी वाचा-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना फलदायी

सहा कोटींची बचत होण्याचा अंदाज

निदर्शनास आलेल्या फायद्यांमध्ये प्रति रोटर ३४० ग्राम सिल्व्हरच्या ब्रेझिंग रॉडची महत्त्वपूर्ण बचत करत आहे, त्यामुळे ब्रेझिंग गुणवत्तेत सुधारणेत समतुल्य अशी १०,४८९ रुपयांनी वाढ झाली आहे. सुधारित रचनेला आवश्यक सूचना आणि सुधारित रेखाचित्रांसह आरएसडीओकडून मंजुरी मिळाली. भारतीय रेल्वे दरवर्षी एक हजार थ्री-फेज इंजिन तयार करते. हे लक्षात घेता, संपूर्ण रेल्वे जाळ्यावर या बदलाच्या अंमलबजावणीमुळे सहा कोटींची आर्थिक बचत होईल, असा अंदाज आहे.

Story img Loader