नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे नियोजन

नंदुरबार : जिल्हा सामान्य रूग्णालयात करोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी चार तास पाण्याचा एक थेंबही न घेता आपले कार्य करीत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी परिचारिकांच्या कामाची वेळ चार तास इतकी निश्चित केली आहे. या कामा दरम्यान त्यांना पाण्याचा एक थेंब अथवा न्हाणीघराची सुविधा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Collector Jalaj Sharma held meeting for handicap people out of his hall
नाशिक : अपंगांसाठी जिल्हाधिकारी तळमजल्यावर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
nandgaon in nar par damanganga river linking project marathi news
नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही
CBSE, inspection of schools, CBSE latest news,
सीबीएसईकडून शाळांची अचानक तपासणी; नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Mumbai, mobile clinic, Maharashtra Health Department , luxury vehicles, health department,
तीन कोटींच्या फिरत्या आरोग्य दवाखान्याचा वार्षिक देखभाल खर्च १३८ कोटी! ७६ फिरत्या दवाखान्यांसाठी १० वर्षात लागणार २००० कोटी
Vasai, school children safety, school van checking in vasai, Badlapur sexual abuse case, transport department, school buses, safety measures, regional transport campaign
शालेय बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी सुरू, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई
Amravati Crime Update, cafe raided,
अमरावती : कॅफेआड युगुलांचे अश्‍लील चाळे!

नंदुरबारमध्ये करोनाबाधितांची संख्या ११ पर्यंत पोहचली असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या करोना बाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुश्रुषा केली जात आहे.

करोना बाधितांच्या विलगीकरण कक्षात काम करणारे डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय वर्गावर कामाचा ताण येवू नये यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे.

सध्या जिल्हा रुग्णालयातील आठ डॉक्टर, १६ परिचारिका आणि आठ एक्सरे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ करोना बाधितांच्या विलगीकरण कक्षाची धुरा सांभाळत आहेत. घरी जाता येत नसल्याने या सर्वाची राहण्याची व्यवस्था जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाच्या आवारतच करण्यात आली आहे.

एका खोलीत दोन लोक, अशा पध्दतीने परिचारिकांसाठी २५ खोल्या आणि आठ डॉक्टरांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आठ दिवस बाधितांवर उपचार करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी स्वखर्चातुन केली. याठिकाणची जेवणाची अडचण ध्यानात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी या कक्षात सेवा देणाऱ्यांना  शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे.     घरापासून दूर राहत करोनाविरूध्द झुंज देणारे पोलीस, आरोग्य  आणि सफाई कर्मचारी यांच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.