नाशिक – इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील जैन मंदिरातून चोरीस गेलेल्या मूर्तींसह दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. संशयितांना घोटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घोटी परिसरातील जैन मंदिरात काही दिवसांपूर्वी मूर्ती चोरी झाली. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पध्दतीने करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुणाल परदेशी (२५, रा. सुरगाणा), केशव पवार (२२. रा. सुकापूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला मुद्देमाल नाशिक येथील बोरगड परिसरात त्यांचा मित्र हेमंत गायकवाड याच्या नकळत त्याच्या खोलीतील पोटमाळ्यावर लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून दोन मूर्तींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना मुद्देमालासह घोटी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.