नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांनी वणी आणि चांदवड परिसरात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला.

वणी गावातील के. आर. टी. महाविद्यालयासमोर वणी-सापुतारा रस्त्याने अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. संशयित मोटार येताच तपासणी करुन देशी मद्याचा एक लाख, ६८ हजार ७०० रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि वाहन असा तीन लाख, १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साईनाथ जाधव (२५, रा. वागळूद) याला ताब्यात घेण्यात आले. अवैध मद्यसाठा त्याचा साथीदार किरण नागरे (रा. रामवाडी) याच्या दुकानातून भरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

nashik firing news in marathi
नाशिक : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार, वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी त्रस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
मोटार चालकाचा खून करणारे नाशिकमधील चोरटे गजाआड- आळेफाटा परिसरात लूटमारीचे गुन्हे
Godhra kand loksatta news
गोध्रा हत्याकांडातील आरोपीकडून लुटमारीचे गुन्हे, पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे; १४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
ladki bahin yojana
नाशिक: बँकेतील रांगेमुळे गरोदर महिलेचा मृत्यू
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई

हेही वाचा – धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील चांदवड-देवळा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत संशयित मोटारीची तपासणी केली. देशी मद्याचा २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहन व अवैध मद्यसाठा असा १० लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सागर कोतवाल (३०), प्रसाद सोनवणे (२४, रा. चांदवड) यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader