नाशिक – जिल्ह्यात हलके डिझेल ऑईलच्या (एलडीओ) नावाखाली डिझेल विक्रीचा अवैध व्यवसाय फोफावला असून यामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये अस्वस्थता आहे. महिनाभरापासून या अवैध व्यवसायाविरुद्ध दाद मागूनही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. धोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत.

हेही वाचा >>> ही तर जनतेची दिशाभूल, रमेश चेन्नीथला यांची टीका

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या सभासदांनी विविध भागात बेकायदेशीरपणे चाललेल्या एलडीओ विक्री केंद्रांना भेटी देऊन अवलोकन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. याची माहिती निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. बहुसंख्य एलडीओ विक्री केंद्र कृषी जमिनीवर कुठलीही अकृषिक परवानी न घेता व्यावसायिक विक्री करीत आहेत. एकाही केंद्राकडे खरेदीची देयके नाहीत. या केंद्रांवर तीन ते सहा हजार लिटरच्या प्लास्टिक टाकीत हलके डिझेल ऑइलची साठवणूक केली जाते. त्यासाठी विस्फोटक (एक्स्प्लोजिव्ह) विभागाची परवानगी घेतलेली नाही. विक्री करणाऱ्या केंद्रावर वाणिज्य वापरासाठी नाही, असे लिहिलेले आहे. वजनमाप विभागाकडून पडताळणी न करता राजरोस विक्री होत आहे. डिझेल वाहनात एलडीओ भरले जाते. कोणालाही देयक दिले जात नाही. पोलीस, तहसीलदार, तलाठी यापैकी कुणाचाही ना हरकत दाखला केंंद्रांनी घेतलेला नसल्याचे पाहणीत उघड झाले. एलडीओ केवळ बॉयलर वा अन्य उष्णता संबंधित उपकरणात वापरले जाते. ही केंद्रे असणाऱ्या परिसरात कुठेही एलडीओ वापरण्यास परवानगी असल्याची साधने दिसत नाहीत. या ठिकाणी विक्री होणारे एलडीओ नसून डिझेल असल्याची संघटनेची खात्री झाली असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा >>> इगतपुरीत काँग्रेस सोडणारे पराभूत हा इतिहास, नाना पटोले यांचा दावा

पाहणीत आढळलेल्या अन्य बाबी मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची संघटनेने वेळ मागितली आहे. अवैध इंधन विक्रीने शासकीय महसूल बुडत आहे. ग्राहक, शेतकरी, शासकीय महसूल या सर्वांचे नुकसान टळावे. यासाठी या विषयाशी संबंधित विभागांची पथके तयार करून सर्व एलडीओ केंद्रांची तपासणी करावी. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी केली. या सर्व घटनाक्रमामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये अस्वस्थता आहे. लाखो रुपये खर्चून शासनाला दररोज कोट्यवधींचा महसूल देत पेट्रोलपंप व्यवसाय उभा राहिलेला आहे. विविध कारणांनी तो आधीच अडचणीत आला आहे. अवैध इंधन विक्रीबाबत महिनाभरापासून पाठपुरावा करण्यात आला. मात्र कारवाई झाली नाही. उलट हा व्यवसाय हातपाय पसरत आहे. संघटनेच्या बैठकीत १५ दिवसात प्रशासनाने कारवाई न केल्यास १६ व्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ४५० पेट्रोलपंप चालक निषेध म्हणून लाक्षणिक बंद पाळणार आहेत.

सहकार उपनिबंधकांकडून प्रोत्साहन या अवैध व्यवसायाला तालुका सहकार उपनिबंधकांनी बैठका घेऊन, यात खासगी दलालांना बोलावत प्रोत्साहन देण्याचे काम केल्याचा आरोप नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर संघटनेने केला. इंधनासंबंधीच्या शासकीय परिपत्रकाची राजरोस पायमल्ली होत आहे.

Story img Loader