लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक – वीज वाहिनीचे काम सुरू असताना खांबाचा मुख्य वाहिनीला स्पर्श झाल्याने महावितरण कंपनीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील विटावे गावात ही घटना घडली. अशा कामावेळी मुख्य वाहिनी बंद करणे अपेक्षित होते. परंतु, गंगावे गावातील धार्मिक कार्यक्रमामुळे वीज पुरवठा बंद करू नये, अशी सूचना ग्रामपंचायतीने केली होती. या परिस्थितीत काम करताना विजेचा धक्का लागून ही दुर्घटना घडल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Two children were injured in pune Narhe due to sudden explosion while bursting firecrackers
दिवे घाटात दूध टँकरची पीएमपी बसला धडक, वाहकासह आठ प्रवासी जखमी
Crime against the wife of Kishore Shinge the then Accounts Officer of Pimpri Municipal Corporation
पिंपरी महापालिकेतील तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगेसह पत्नीवर गुन्हा
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
woman on two wheeler seriously injured in collision with rickshaw in Kalyan
मोटारीच्या धडकेत महापालिकेतील सफाई कामगार महिलेचा मृत्यू; खराडी भागातील घटना
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी

काजीसांगवीलगतच्या विटावे गावात आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत महावितरणची कामे सुरू आहेत. या ठिकाणी मंगळवारी कर्मचारी नवीन वाहिनी टाकणे, वीज खांब बसविण्याचे काम करत होते. यावेळी एक वाहिनी बंद ठेवली गेली. पण मुख्य वाहिनीद्वारे गंगावे गावचा पुरवठा सुरू ठेवला गेला होता. खांब जागेवरून हलवत असताना त्याचा मुख्य वाहिनीला स्पर्श झाला आणि दुर्घटना घडली. त्यात केवलसिंग पडवी आणि सुनील वळवी या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती महावितरणच्या स्थानिक अभियंत्याने दिली. या घटनेची माहिती मिळताच वीज कंपनीतील अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले दोन्ही युवक हे वीज कंपनीच्या ठेकेदाराकडील कर्मचारी होते. कंत्राटी स्वरुपात ते काम करत होते.

हेही वाचा >>>पेसा पदभरती कृती समितीचे आदिवासी भवनात आंदोलन; ईदगाह मैदानापासून मोर्चा, मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

अशा प्रकारची कामे करताना आसपासच्या सर्व वाहिनीवरील वीज पुरवठा बंद ठेवला जातो. यावेळी एका वाहिनीवरील वीज पुरवठा बंद करून मुख्य वाहिनीचा पुरवठा सुरू ठेवला गेला होता. या वाहिनीवरून पुढील गंगावे गावात वीज पुरवठा होतो. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामुळे गंगावे गावचा वीज पुरवठा बंद करू नये, अशी मागणी ग्रामपंचायतीने महावितरणकडे पत्राद्वारे केली होती. ग्रामपंचायतीच्या आग्रहामुळे मुख्य वीज वाहिनी बंद न करताच हे काम हाती घेतले गेले आणि वितरण व्यवस्थेची दुरुस्ती दोन कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतली. या प्रकाराने वीज कर्मचाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या दुर्घटनेबाबत महावितरणने चांदवड पोलिसांकडे माहिती दिल्याचे अभियंत्याने सांगितले.