नाशिक – मतदार चिठ्ठी वाटपावरून नाशिक पश्चिम मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांचे समर्थक माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्यात शुक्रवारी वाद होऊन हाणामारी झाल्यानंतर परस्पर विरोधी गुन्हे अंबड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यातील प्रमुख संशयित शहाणे पोलिसांच्या लेखी फरार असताना रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या महायुतीच्या सभेत व्यासपीठावर शहाणे उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारी सिडकोतील हनुमान चौकात भाजप उमेदवार हिरे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उमेदवार बडगुजर यांचे समर्थक मतदार चिठ्ठी वाटप या मुद्यावर एकमेकांशी भिडले. हिरे गटाकडून चिठ्ठी वाटपाच्या माध्यमातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला. बडगुजर गटाकडून हा आरोप फेटाळला गेला. यावरून झालेल्या वादात झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मुकेश शहाणे याच्यासह बडगुजर यांचा मुलगा मयुरेश याचाही समावेश आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य लोक फरार असल्याचे अंबड पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक: सिडकोत पोलीस संचलन

विशेष म्हणजे, पोलिसांच्या लेखी फरार असलेला मुकेश शहाणे रविवारी फडणवीस यांच्या सभेत व्यासपीठावर हजर होता. व्यासपीठावर त्याने प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, पवन भगूररकर यांच्याशी हस्तांदोलन करत काही वेळ चर्चाही केली. व्यासपीठावर इतरांच्याही त्याने भेटी घेतल्या. फडणवीस यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मात्र तो दिसेनासा झाला.