धुळे : येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. यावेळी शहराचे एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी नववधु वरांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले. विवाह सोहळ्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, नवापूर, भुसावळ येथून नागरिक आले होते. आमदार शाह हे वर्षातून दोन वेळा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. ते या सोहळ्यात विधवा, परित्यक्त्या, निराधारांच्या मुलामुलींचे मोफत विवाह लावतात.
हेही वाचा : ग्रामीण भागातील मंदिर परिसराचाही आता विकास, नाशिक जिल्ह्यासाठी तीन कोटींच्या निधीला मंजुरी
यावेळी नवीन जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू आणि जेवणाचा खर्च आमदारांनी केला. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते. या विवाह सोहळ्यासाठी भिखन हाजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या कार्यरत होत्या. या सोहळ्यास मालेगावचे माजी नगरसेवक रहेमान पहेलवान, मालेगावचे माजी उपमहापौर एजाज बेग, इफ्तेकार अहमद अन्सारी, गुफरान पोपटवाले आदी उपस्थित होते.