धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हेच मुख्य उद्दिष्ट असून अद्याप धुळे मतदारसंघात उमेदवाराविषयी ‘एमआयएम’चा निर्णय झालेला नाही, असे आमदार फारूक शाह यांनी सांगितले. धुळे लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तत्पूर्वी भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन प्रतिस्पर्धी पक्षांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले असताना महाविकास आघाडीतर्फे अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. एमआयएमनेही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पक्षाची भूमिका मांडताना आमदार शाह यांनी, पक्षश्रेष्ठींशी आपली चर्चा झाली असून उमेदवार देण्याविषयी निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

सध्या रमजान सुरु आहे. उपवास आणि प्रार्थनेचा काळ आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर यासंदर्भात काही निर्णय होऊ शकेल असे वाटत नाही. भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट ठेवून एमआयएम काम करणार आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला असला तरी त्याला स्वीकारले जाईल का, असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला. खासदार भामरे यांनी मतदार संघात ठोस अशी कामे केलेली दिसत नाहीत. आपण मात्र आपल्या मतदार संघात कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून विकास कामे केली आहेत. माजी आमदार अनिल गोटे हेही कार्यसम्राट म्हणून प्रसिद्धी मिळाविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule aimim mla shah faruk anwar told that defeat of bjp in lok sabha is the goal css
Show comments