धुळे : भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजनेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यातील आतापर्यंत वाहतूक आणि दळणवळणापासून दूर राहिलेले पाडे, वस्त्या, बारमाही जोडरस्त्यांनी जोडली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. साक्री तालुक्यातील उंबरखडवा येथे अर्जुनसागर ॲग्रो प्रोड्‌युसर कंपनी मार्फत आयोजित बचत गट आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात डाॅ. गावित यांनी मार्गदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या दोन वर्षात सर्व गाव, पाड्यातील रस्ते तयार करण्यात येणार असून हे रस्ते कमीत कमी पाच वर्षे चांगले टिकतील असे दर्जेदार करण्याच्या सूचना डाॅ. गावित यांनी यावेळी दिल्या. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून वीज पुरवठा, नवीन रोहित्र बसविणे, नवीन उपकेंद्र करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी या भागातीलढे नदी, नाल्यांवर साखळी बंधारे कसे बांधता येतील, याचा सर्व्हे करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : विश्लेषण : निवडणूक काळात कांद्याच्या भाववाढीने सरकारचे धाबे दणाणले? केंद्रीय पथकाच्या नाशिकवारीचे कारण काय?

येत्या काळात वरच्या भागात उपसा सिंचन योजना तयार करुन या भागातील शेतीसाठी प्रत्येकांच्या शेतात पाणी पोहचून शेतीचे उत्पन वाढविण्याचे प्रयत्न केले जाईल. पाणी उपलब्ध झाल्यावर येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून शेडनेट, पॉली हाऊसचा लाभ घ्यावा. गतवर्षी २७५ शेडनेट साक्री, शिरपूर व नंदुरबार तालुक्यात देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या काळात दोन हजार महिला बचतगटांना विविध प्रकारच्या भाजीपाला पिकावर प्रक्रिया करुन ते सुकविण्यासाठी सौरयंत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कापूस, मका, तूर यांच्या टाकाऊ काड्यांपासून टोकळे तयार करण्याचे यंत्र देणार असून ते टोकळेही आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करण्यात येतील, असे डाॅ. गावित यांनी नमूद केले. ज्या नागरिकांकडे घरे नाहीत आणि ‘ड’ यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना शबरी आवास योजनेतंर्गत प्रत्येकाला १०० टक्के घरकुल देण्यात येईल.

हेही वाचा : नाशिक: भेसळीच्या संशयाने ३९७ किलो पनीर साठा जप्त

यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी, आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांनी या भागातील बऱ्याच ग्रामपंचायतींना नवीन रस्ते व जुने रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगितले. साक्री तालुका हा भौगोलिकदृष्टया खुप मोठा असल्याने या साक्री पट्ट्यात रस्त्याची लांबी जास्त असल्याने डॉ.गावित यांनी रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास ५० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहे. त्या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. चौपाळे गटासाठी विविध विकास निधीतून जवळपास १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवराच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प.सदस्या सुमित्रा गांगुर्डे, खंडु कुवर, विश्वनाथ बागुल, पंचायत समिती कृषी अधिकारी रमेश नेतनराव, सरपंच संदीप चौरे, अर्जुनसागर ॲग्रो प्रो.कंपनीचे अध्यक्ष पिंटु अहिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामलाल जगताप यांनी केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule at sakri minister dr vijaykumar gavit gives assurance to construct roads in tribal areas css