धुळे : जिल्हा परिषद अपहार कांडातील संशयित भास्कर शंकर वाघ याच्या घरातून जप्त केलेल्या एकवीरा देवी मंदिरातील दागिन्यांचा १० ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या आवारात लिलाव करण्यात येणार आहे. १९९० मध्ये बहुचर्चित धुळे जिल्हा परिषद अपहार कांड झाले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित भास्कर वाघ याच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ याच्या घरातून देवीचे सोने, चांदीचे दागिने जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव आता न्यायालयाकडून करण्यात येणार आहे.

हेही वाचा : चाळीसगावात अफू बोंडासह चुरा मिळून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

जिल्हा व सत्र न्यायालयाने या लिलावपूर्व नियम आणि अटींची जाणीव करून दिली आहे. लिलावात दागिने घेणाऱ्याने दागिने परत श्री एकविरा देवी देवस्थानास दान करावयाचे आहेत, असे जिल्हा व सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारात लिलाव होणाऱ्या या दागिन्यांमध्ये पदक असलेला एक पदरी (६८.५०० ग्रॅम) सोन्याचा चार लाख एक हजार १३४ रुपयांचा हार, कैरीची नक्षी असलेला (१७२ ग्रॅम) सोन्याचा १० लाख नऊ हजार ७१० रुपयांचा चारपदरी हार, पदक आणि कैरीची नक्षी असलेली तीन पदरी (५४.१०० ग्रॅम) सोन्याची तीन लाख १६ हजार ४८५ रुपयांची बिंदी, चांदीचे (१२७.६०० ग्रॅम) नऊ हजार ६० रुपयांचे बाजूबंद, असे आजच्या बाजार भावाप्रमाणे सुमारे १७ लाख ३६ हजार ३८९ रुपये किंमतीचे दागिने या लिलावात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या खटल्याचे विशेष सरकारी वकील संभाजी देवकर यांनी दिली. जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याच्या नावे संपूर्ण लिलाव करण्यात येणार असून लिलाव घेणाऱ्याने पूर्ण रक्कम न भरल्यास मुद्देमालाचा फेर लिलाव करण्यात येईल.