धुळे : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योग उभारल्यास उद्योग मंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा इशारा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी दिला आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीत शिंदखेडा तालुक्याची जमीन गेली आहे. याठिकाणी उद्योग वाढीसाठी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मागील काळात सिमेंट कंपन्यांमुळे या भागातील विहीरींना लालसर पाणी येत असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक कंपन्यांना विरोध केला आहे.

हेही वाचा : मालेगावात आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा, टंचाईसदृश्य परिस्थितीचा फटका

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

भविष्यात या भागात कोणत्याही रासायनिक कंपन्यांनी उद्योग उभारू नयेत किंवा अशा त्रासदायक उद्योजकांना जागाच देवू नये, असा इशारा भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नथा वारुळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. उद्योग मंत्र्यांनी परस्पर कोणत्याही रासायनिक कंपनीला जागा दिलीच असेल तर लोक या ठिकाणी उद्योग उभा राहू देणार नाहीत. उद्योग मंत्र्यांनी आपल्या भागात रासायनिक उद्योग न्यावेत, स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी या सर्वांचाच रासायनिक उद्योजकांना विरोध असतांना उद्योग मंत्री परस्पर रासायनिक उद्योगांना जागा देत असतील तर प्रसंगी त्यांचा पुतळा दहन करण्यात येईल, असा इशाराही वारुळे यांनी दिला आहे. अगोदरच दुष्काळ पाचवीला पुजलेला असतांना रासायनिक उद्योग नको, असे वारुळे यांनी म्हटले आहे.