धुळे: गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी धुळ्याजवळ नागपूर-सुरत महामार्गावर घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झाली नाही. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

गुजरातहून महाराष्ट्रात नायट्रोजन गॅस असलेला टँकर येत असताना धुळ्याजवळ अचानक टँकरने पेट घेतला. सकाळी नागपूर-सुरत महामार्गांवर साक्री तालुक्यातील घोडदे शिवारात ही घटना घडली. टँकरच्या चालक कक्षापर्यंत आग पोहोचल्याचे लक्षात येताच चालकाने उडी घेतली. यानंतर आग वाढली. टँकरची पुढील चाके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग वाढत असल्याने आणि महामार्गावरील वाहतूक सुरु असल्याने धोका ओळखून ग्रामस्थांनी पोलिसांना यां घटनेची माहिती दिली.

Mumbai-Kolkata national highway, Flyover,
भोंगळ कारभार! मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Traffic movement after debris clear on vani ghat
वणी घाटातील दरड हटवून मार्ग मोकळा
rajapur, Anuskura Ghat, Landslide in Anuskura Ghat, traffic disruption in anuskura ghat, landslide, Mumbai Goa highway, roadblock, Public Works Department, soil removal,
राजापूर : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प
bikers died Kankavali, bikers died Mumbai-Goa highway,
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली येथे अपघातात दोन दुचाकीस्वार ठार
Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला
traffic was disrupted when a truck going to Mumbai got stuck in Ukshi Ghat
गुगल मॅपवर जाणारा ट्रक उक्षी घाटात अडकल्याने वाहतूक खोळंबली
Farmers agitation on Bhavdbari-Rameshwar Phata road
नाशिक : भावडबारी-रामेश्वर फाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

हेही वाचा : नाशिक, दिंडोरीतील महायुती, मविआचे उमेदवार विजयावर ठाम, मतदानोत्तर चाचण्यांविषयी सावधगिरी

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, उपनिरीक्षक रवंदळ, संतोष तोटे, मंगेश खैरनार, निखिल काकडे, रामलाल अहिरे यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केले. अग्निशमन दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. थोड्याच वेळात आग विझविण्यात आली. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. आगीत टँकरची पुढील चाके तसेच चालक कक्ष खाक झाले. या घटनेची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.