धुळे: गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी धुळ्याजवळ नागपूर-सुरत महामार्गावर घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झाली नाही. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातहून महाराष्ट्रात नायट्रोजन गॅस असलेला टँकर येत असताना धुळ्याजवळ अचानक टँकरने पेट घेतला. सकाळी नागपूर-सुरत महामार्गांवर साक्री तालुक्यातील घोडदे शिवारात ही घटना घडली. टँकरच्या चालक कक्षापर्यंत आग पोहोचल्याचे लक्षात येताच चालकाने उडी घेतली. यानंतर आग वाढली. टँकरची पुढील चाके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग वाढत असल्याने आणि महामार्गावरील वाहतूक सुरु असल्याने धोका ओळखून ग्रामस्थांनी पोलिसांना यां घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : नाशिक, दिंडोरीतील महायुती, मविआचे उमेदवार विजयावर ठाम, मतदानोत्तर चाचण्यांविषयी सावधगिरी

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, उपनिरीक्षक रवंदळ, संतोष तोटे, मंगेश खैरनार, निखिल काकडे, रामलाल अहिरे यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केले. अग्निशमन दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. थोड्याच वेळात आग विझविण्यात आली. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. आगीत टँकरची पुढील चाके तसेच चालक कक्ष खाक झाले. या घटनेची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.