धुळे : भिशीच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेतून सभासदांना पैशांचे वितरण न करता ३७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयाखाली दोन महिलांसह सहा जणांविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रतिभा पाटील (रा. संजयभाऊ नगर, मोहाडी, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लताबाई साळुंखे, हिरामण साळुंखे, राकेश साळुंखे, मुकेश साळुंखे (चौघे रा. संजयभाऊ नगर, मोहाडी), शितल पाटील आणि कुणाल पाटील (दोन्ही रा. फागणे) यांनी २०१५ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत भिशी सुरू केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : समृद्धीवरील अपघातामुळे अनेक जण पोरके, कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाचे मातृछत्र

या सहा जणांनी सभासदांकडून दरमहा प्रत्येकी पाच हजार ते १० हजार रुपये जमा केले. जमा झालेल्या रकमेतील प्रत्येक सभासदाच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपयांचे दरमहा वितरण न करता ते देण्यास टाळाटाळ केली. ही रक्कम ३७ लाख ४० हजारांवर पोहचली असतांनाही सभासदांना त्यांच्या हिश्याची रक्कम देण्यात आली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांनी लताबाई साळुंखे यांच्यासह सहा जणांविरूद्ध पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule fraud in bhishi police case registered against 6 persons css
Show comments