धुळे : तालुक्यातील बोरकुंड, मोघण शिवारात १५ दिवसांत तीन बालकांना ठार करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात सापडला. बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश डुढवे (१०, मोघण, धुळे) या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. डुढवे कुटूंब मूळचे मध्य प्रदेशातील असून रोजगारानिमित्त धुळे तालुक्यात आले होते. रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असतांना बिबट्याने त्याला उचलून नेले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी रमेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आरक्षणासाठी जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक; नेत्यांसह मंत्र्यांना गावबंदी, कँडल मार्च, पदाधिकाऱ्यांचे उपोषण

त्याचा रविवारी मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात याआधी दोन बालकांचा मृत्यू झाला होता. वन विभागाने चार दिवसापासून बिबट्याला जाळ्यात पकडण्यासाठी १० पिंजरे, २० कॅमेरे आणि तीन नेमबाजांसह जवळपास ७० कर्मचार्‍यांचे पथक असा ताफा तैनात केला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बिबट्या सोमवारी पहाटे जाळ्यात अडकला. त्याला बेशुद्ध करण्यात आले. बिबट्याला सुरक्षित अधिवास क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule leopard that killed three children is caged by the forest department css