धुळे : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समायोजन करावे, आरोग्य सेवेत कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघ, समायोजन कृती समितीने बुधवारी सकाळी शहरातून मोर्चा काढला. या मोर्चात कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समायोजन करावे. तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. तसेच आठ दिवसांपासून क्युमाईन क्लबरोडवर धरणे आंदोलन सुरु आहे.

हेही वाचा : हवाई प्रशिक्षणात आभासी प्रणालीवर भर, आर्मी एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत सोहळा

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातंर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, डाटाएंट्री ऑपरेटर, लेखाधिकारी असे एक हजार २५० कर्मचारी तर राज्यभरातील ३५ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. अद्याप शासनाला जाग आलेली नसल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिवतीर्थापासून क्यूमाईन रोडपर्यंत मोर्चा काढला. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा, लसीकरण ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे.