धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर शिवारात वडपाडा येथील बनावट देशी दारूचा कारखाना पिंपळनेर पोलिसांनी उध्वस्त केला. या कारवाईत सुमारे १० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
वडपाडा येथे एका घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली. सुदाम सूर्यवंशी यांच्या राहत्या घरात बनावट दारुचा कारखाना असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी टँगो पंच नावाची देशी दारू बेकायदेशीरपणे तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा : “निवृत्ती म्हणजे राजकारण नव्हे”, खासदार सुभाष भामरे यांच्याकडून प्रतापराव दिघावकर लक्ष्य
दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, वाहने, काचेच्या बाटल्या, बुच, लोखंडी यंत्र, नावपट्टी आणि अन्य साहित्य असा सुमारे १० लाख ४७ हजारांचा मुद्देमाल त्या ठिकाणी होता. घरमालक सूर्यवंशीसह साथीदार विशाल वाघ (रा.मोगलाई, धुळे, ह.मु. कालिकामाता मंदिराजवल पिंपळनेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा : नाशिकमधील कोंडीवर मुबलक वाहनतळ, रुंद रस्त्यांचा तोडगा शक्य; शिवसेनेचे सर्वेक्षण मनपाकडे सादर
मुद्देमाल नष्ट करून पोलिसांनी कांतीलाल अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सूर्यवंशी, वाघ यांच्यासह अण्णा पाटील (सांगवी, शिरपूर), छोटू राजपूत (रा.शिरपूर) या चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे