धुळे : रुग्णवाहिकेतून रुग्णांची वाहतूक होत असते, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, याव्यतिरिक्तही इतर कारणांसाठी रुग्णवाहिकेचा सर्रासपणे उपयोग होत असल्याचे अनेकवेळा उघड होते. धुळे जिल्ह्यातही पोलिसांना तोच अनुभव आला. एका रुग्णवाहिकेचा संशय आल्याने त्यांनी तिची तपासणी केली असता रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हते तर, भलताच प्रकार दिसून आला.सात मार्चच्या रात्री ११ वाजता प्रकरणी विजय पोलाद चव्हाण रा. मालवीय मगर महू (जि. इंदूर) याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोंडाईचा-धुळे रस्त्यावरील धुळे चौफुलीवर संशयास्पद रुग्णवाहिका पोलिसांनी अडवली. रुग्णवाहिकेची तपासणी केली असता पोलिसांना आतमध्ये रुग्णांऐवजी दाटीवाटीने कोंबलेली गोवंशीय जनावरे दिसली. निर्दयीपणे कोंबण्यात आल्याने रुग्णवाहिकेतच जनावरांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. किती जनावरे होती, याची पोलिसांकडून माहिती देण्यात आली नाही. या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका आणि एक लाख ३० हजार रुपयांची जनावरे असा ऐवज हस्तगत केला.

हेही वाचा : केंद्र सरकारच्या विरोधात नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची कांदा रथयात्रा, महायुतीची डोकेदुखी वाढली

दुसऱ्या एका घटनेत शिरपूर तालुका पोलिसांनी एक मालवाहू वाहन अडवले. तपासणी केली असता सेंधव्याहून धुळ्याकडे निघालेल्या या वाहनात निर्दयीपणे जनावरे कोंबण्यात आली होती. याप्रकरणी संजय भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनजीत सिंग बलविंदर सिंग, ग्यानसिंग गुरमेल सिंग व दिलबार सिंग करनाल सिंग या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातील १२ लाख १३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule police found cattle in ambulance while inspection many cattle found dead css
Show comments