धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बनावट मतदार ओळख पत्र तयार करुन शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळ्यातील मोहाडी उपनगरात एका फोटो स्टुडिओवर छापा टाकून बनावट मतदार ओळखपत्र आणि साहित्य जप्त केले. दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवारी माहिती दिली. विनोद गरुड (रा.गायकवाड चौक, धुळे) हा मोहाडी उपनगरातील भटाई माता रिक्षा थांब्याजवळील सूर्योदय फोटो स्टुडिओचा चालक सूर्यकांत कोकणी याच्या मदतीने बनावट मतदार ओळखपत्र तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोकांकडून पैसे घेवून त्यांच्या आधार कार्डवरुन संगणकाच्या आधारे मतदार नंबर टाकून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बनावट मतदान कार्ड तयार करत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सूर्याेदय फोटो स्टुडिओवर छापा टाकला.
हेही वाचा : दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
स्टुडिओत १४ लोकांचे बनावट मतदार ओळखपत्र अर्थात मतदान कार्ड मिळून आले. तसेच मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारा फोटो पेपर, ज्या संगणकावर ओळखपत्र तयार करण्यात येत होते, ते संगणक आणि प्रिंटर तसेच या कामासाठी वापरण्यात येणारा मोबाईल असे एकूण ३५ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
हेही वाचा : माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक
याप्रकरणी कोकणी आणि गरुड यांच्याविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या १४ जणांचे बनावट मतदार ओळखपत्र तयार केले, त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार संदीप पाटील, सुरेश भालेराव, रवींद्र माळी, रविकिरण राठोड, नीलेश पोतदार, सुशिल शिंदे, गुणवंत पाटील यांनी केली.