धुळे : शहराला पाणी पुरवणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीला लागणारी गळती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. या योजनेला बाभळे (ता.शिंदखेडा) शिवारात जलशुद्धीकरण केंद्रासमोर सुरू झालेली गळती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मुंबई-आग्रा महामार्गालगतच ही जलवाहिनी आहे. गळतीमुळे शहरातील अनेक वसाहतींतील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले. शिवाय पाण्याची नासाडी आणि महापालिकेच्या तांत्रिक यंत्रणेचीही धावपळ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोलबाला झालेल्या अक्कलपाडा योजनेचाही गळतीनेच शुभारंभ झाला आहे. या दोन्ही योजनांतून किमान आठवडाभरही विना गळती पाणी पुरवठा झालेला नाही. शहराला तापी आणि अक्कलपाडा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी पुरवठा केला जातो. यांपैकी किमान ८० टक्के भागात एकट्या तापी योजनेतून पाणी पुरविले जाते.

हेही वाचा : मालेगावात रोहिंगे, बांगलादेशी आढळल्यास राजकारणातून संन्यास, माजी आमदार आसिफ शेख यांचे आव्हान

सद्या शहरातील विविध वसाहतीत चार ते पाच किंवा आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. गेल्या आठवड्यात बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा जवळपास १६० कोटी रुपये खर्चाच्या अक्कलपाडा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली होती, यामुळे देवपुरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. ‘तापी पाणी पुरवठा योजनेला लागलेली गळती थांबविण्यात आली आहे. हे काम पहाटे तीन वाजता पूर्ण झाले. यानंतर तापी पाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे’, अशी माहिती धुळे महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत ओगले यांनी दिली.