जळगाव : जिल्हाभरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत महसूल प्रशासनाकडून सात महिन्यांत तब्बल सहा कोटी ७९ लाख १३ हजार १७४ रुपयांची कमाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये ८२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ११३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. असे असतानाही अजूनही वाळू तस्कर शिरजोर झाले असून, विविध क्लुप्त्या वापरत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक सर्रासपणे होतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माफियांकडून एकाच पावतीवर अनेक वाहने भरून वाळूचे खुलेआम उत्खनन करुन वाहतूक केल्याचे निदर्शनास आले आहे. हे कमी की काय धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, नाशिक येथील पावत्यांवर जळगाव जिल्ह्यातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते. राज्यभरातील गौण खनिजाबाबत अशीच स्थिती असल्याने शासनातर्फे धोरण ठरविण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात प्रशासनाकडून गौण खनिज विकण्याचे ठरविण्यात आले.

हेही वाचा : मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मला…”

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एक एप्रिल ते १० ऑक्टोबर या सात महिन्यांत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, डंपरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यात तब्बल ५१२ वाहनांना सहा कोटी ७९ हजार १७४ रुपयांचा दंड सुनावण्यात आला, तर दंडापोटी तीन कोटी दोन लाख ६९ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

सात महिन्यांत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीत जळगाव, चाळीसगाव हे तालुके आघाडीवर आहेत. या तालुक्यांत प्रत्येकी ८० वाहनांवर, तर त्याखालोखाल अमळनेर तालुक्यात ५७, भडगावात ४९, एरंडोलमध्ये ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा ३६, यावल ३२, धरणगाव ३१, रावेर २८, भुसावळ २५, चोपडा १७, मुक्ताईनगर १२, पारोळा व जामनेर या तालुक्यांत प्रत्येकी १० आणि बोदवड तालुक्यात दोन अशा जिल्ह्यात ५१२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : कर्ज घोटाळ्यातील रकमेची परराज्यात गुंतवणूक; भुसे समर्थकांचा अद्वय हिरेंवर आरोप

एक एप्रिल ते १० ऑक्टोबर या कालावधीत सहा कोटी, ७९ लाख, १३ हजार, १७४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर दंडापोटी तीन कोटी, दोन लाख, ६९ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले असून, दंड व बंधपत्र घेतल्यानंतर २२९ वाहने सोडण्यात आली आहेत.

जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात महिन्यांत ८२ गुन्ह्यांत १३३ संशयितांना अटक करण्यात आली आहेत. जळगाव तालुक्यात सर्वाधिक २७ गुन्ह्यांत ५३ संशयितांना अटक केली आहे. त्याखालोखाल भडगाव तालुक्यात १४ गुन्ह्यांत १४, भुसावळमध्ये आठ गुन्ह्यांत १४, चाळीसगावात आठ गुन्ह्यांत ११, धरणगावात सहा गुन्ह्यांत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon action taken against illegal minor mineral excavation fine of rupees 6 crore collected within 7 months css