जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अधूनमधून कायमच रंगत असते. खडसे हे नुकतेच दिल्ली येथे जाऊन आल्याने ही चर्चा अधिक प्रमाणात होऊ लागली. त्याविषयी आता खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे यांचे कुटुंब नेहमीच संभ्रम निर्माण करते. आताही भाजपमध्ये येणार- येणार अशा चर्चा असल्या, तरी ते येतील, तेव्हा आम्ही आमच्या खास कार्यशैलीने त्यांचे स्वागत करू, या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री महाजन यांनी आपले मत मांडले. स्वागतच करणार आहेत ना ! ज्यावेळी येतील तेव्हा ना ! ठरू तर द्या मुहूर्त. हे सर्व जर तरचे प्रश्न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपप्रवेश करणार, हे सर्व समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतूनही येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू, असे सूचक वक्तव्य मंत्री महाजन यांनी केले.
हेही वाचा : नाशिक: मतदारसंघातील प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान, मविआ बैठकीत निर्णय
जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्य मिळणार असून, यात जळगाव मतदारसंघातून एक ते सव्वा लाखाचे मताधिक्क्य असेल. दोन्ही ठिकाणी विजय निश्चित असून, कुणीही काहीही चर्चा केली, तरी जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलला जाणार नाही, असे स्पष्टीकरणही महाजन यांनी केले.
हेही वाचा : नाशिक: वावीत घरफोडी करणारी टोळी ताब्यात, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एकमेकांविषयी असलेली नाराजी दूर झाली का, यावर महाजन यांनी, चंद्रकांत पाटील यांचा मुद्दा वेगळा होता. मलाही ते भेटायला आले होते. मात्र, पण मला उशीर झाला. त्यानंतर आम्ही दोघे जळगावात भेटलो. मी त्यांना सांगितले, आपल्याला निवडणुकीत सोबत काम करावे लागेल. महायुतीचा घटकपक्ष म्हणून आपण सोबत आहोत. आपणही शिंदे गटात आहात. चंद्रकांत पाटील आमच्यासोबत आता आहेत, असे नमूद करीत आपण व आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत रक्षा खडसेंसोबत राहावे, असे पाटील यांना चर्चेवेळी सांगितले. आता मला वाटते, त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांनीही मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करायचे आहे. मतदान कमळालाच करायचे आहे, अशी ग्वाही दिल्याचे महाजन यांनी सांगितले. ते गेल्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर रक्षा खडसे यादेखील आल्याचे महाजन यांनी नमूद केले.